Rahul Gandhi in Dhule: माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणेंचं नाव घेत राहुल गांधींचे मोदी सरकारवर गंभीर आरोप

Manoj Naravane Agniveer Scheme: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची आज धुळ्यामध्ये रॅली घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
rahul Gandhi
rahul Gandhiesakal

नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची आज धुळ्यामध्ये रॅली घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. अग्निवीर योजना जेव्हा आणण्यात आली, तेव्हा देशाच्या लष्कराचे जे प्रमुख होते त्यांना अग्निवीर योजनेबाबत काहीही माहिती नव्हतं, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. (congress leader rahul gandhi nyay yatra in dhule maharashtra today speech)

विचार करण्यासारखी गोष्टी आहे. महाराष्ट्रातील असलेले मनोज नरवणे, देशाच्या लष्कराचे प्रमुख होते. पण, त्यांना अग्निवीर योजनेची काहीही माहिती नव्हती. मोदींनी अग्निवीर आणलं पण देशाच्या लष्कर प्रमुखाला याची माहिती देण्यात आली नाही. ही हुकूमशाही नाही तर काय आहे, असा सवाल राहुल गांधी यांनी केलाय.

rahul Gandhi
Bharat Jodo Nyay Yatra : खासदार राहुल गांधी महिलांशी संवाद साधणार : प्रतिभा शिंदे

देशात यापूर्वी एका प्रकारचे शहीद होते. भारतीय सैनिक शहीद झाल्यास त्यांच्या कुटुंबाला पेंशन मिळायचं, सन्मान मिळायचा. देशाचे लष्कर त्यांच्या कुटुबांचे संरक्षण करायचे. पण, आता मोदी सरकारकडून दोन प्रकारचे शहीद बनवण्यात आले आहेत. एका बाजूला शहीद ज्याला पेंशन मिळेल, शहीदाचा दर्जा मिळेल. पार्थिवावर तिंरगा ठेवला जाईल, असं ते म्हणाले.

दुसऱ्या बाजूला एक शहीद आहे ज्याला कोणतीही पेंशन मिळणार नाही. शहीदाचा दर्जा मिळणार नाही. त्यांना फक्त अग्निवीर म्हटलं जाईल. चीनच्या सैनिकांना तीन-चार वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. आपल्या अग्निवीराला सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना चीनच्या लष्करासमोर उभं केलं जाईल. एकाला चार वर्षांचे प्रशिक्षण आणि दुसऱ्याला सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिल्यास लढाई होऊ शकेल का? असा सवाल राहुल यांनी केलाय.

rahul Gandhi
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांचा रोड-शो! वाहतूक मार्गात बदल; कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन

अग्निवीर का आणण्यात आलंय? मोदींना वाटतंय की, पेंशनचा पैसा अदानी डिफेन्समध्ये जावा. अदानीने शस्त्र खरेदी करावेत. अदानी अमेरिका, इस्त्राईलच्या कंपन्यांशी हात मिळवेल. त्यांच्या माध्यमातून इथे शस्त्र तयार केले जातील. आधी बीएचएल शस्त्र बनवायचे, आता अदानी बनवतील. सैनिकांच्या रक्षणासाठी वापरला जाणारा पैसा अदानीला दिला जाणार आहे, अशी टीका राहुल यांनी केली. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com