‘राहुल यांनी पदाचा राजीनामा देऊ नये’

Rahul-gandhi
Rahul-gandhi

मुंबई - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राजीनाम्याचा आग्रह न धरता पक्षाध्यक्षपदी कायम राहावे, असा विनंतीवजा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती व मुंबई विभागीय काँग्रेस समितीने गुरुवारी एकमताने मंजूर केला आहे.

टिळक भवन दादर येथे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा आग्रह न धरता अध्यक्षपदी कायम राहावे, असा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मांडला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी त्याला अनुमोदन दिले. उपस्थित सर्व नेत्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला व एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.  

त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. येत्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत. सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून सर्व समाजातील तरुणांना व नवीन नेतृत्वाला संधी देण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, तसेच नवनियुक्त खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचे अभिनंदन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com