
नवनीत राणांच्या आरोपांवर सावंत म्हणाले,"हा सूर्य आणि हा जयद्रथ…"
पोलीसांनी आपण मागासवर्गीय असल्यामुळे आपल्याला वाईट वागणूक दिली असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये राणा दाम्पत्याला नक्की कशी वागणूक दिली गेली याचा व्हिडिओ मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विट केला आहे. यावर कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर २३ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यातच रात्र काढावी लागली. यावेळी त्यांना आपल्याला पिण्यासाठी पाणी दिलं नाही ना वॉशरुमला जाऊ दिलं. तसेच आपण मागासवर्गीय असल्यानं पोलीस कर्मचाऱ्यानी आपल्याला पाणी देण्यास नकार दिला, असा गंभीर आरोप राणा यांनी खार पोलिसांवर केला होता.याबाबत त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांनाही पत्र लिहिले होते. या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला होता.
हेही वाचा: नवनीत राणांच्या आरोपाचं पितळ उघड? पोलीस आयुक्तांचं ट्वीट
नवनीत राणा यांच्या आरोपांनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खार पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेजची एक क्लीप ट्विट केली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे दोघेही चहा पिताना स्पष्ट दिसत आहेत. हा व्हिडिओच सर्व काही सांगत असल्याचं सूचकपणे संजय पांडे यांनी म्हटलं आहे. हे पोलीस आयुक्तांचं ट्विट पुन्हा शेअर करत सचिन सावंत यांनी "हा सूर्य आणि हा जयद्रथ…" असे ट्विट करत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा: LIC IPO 'या' तारखेला लॉंच होण्याची शक्यता; सूत्रांची माहिती
याआधी भाजप नेते किरीट सोमय्या आणि नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवार केलेले आरोप खोटे असल्याचे कॉंग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले होते. त्यांनी मुंबई पोलिसांवर केलेले आरोप धादांत खोटे आणि दुर्दैवी असून सुशांत सिंह प्रकरणापासून भाजपतर्फे मुंबई पोलीसांना बदनाम करण्याची व्यापक मोहीम हाती घेतली त्यांचा हा भाग असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र मुंबई पोलीसांची बदनामी कदापि सहन करणार नाही, असे देखील त्यांनी बजावले आहे.
हेही वाचा: अनिल देशमुखांवर परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे, चांदीवाल अहवालात स्पष्ट
Web Title: Congress Sachin Sawant On Navneet Rana Allegations And Mumbai Police Commissioner Tweet
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..