
सीमावाद! सोलापूर, अक्कलकोट आमचेच, बेळगाव, निपाणी, कारवारही सोडणार नाही
सोलापूर : सोलापूर, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर हा भाग महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. तेथील लोकांनाही महाराष्ट्रातच राहायचे आहे. त्यामुळे त्याच्या बदल्यात बेळगाव घेतल्याचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. पण, बेळगाव, निपाणी, बिदर व कारवार यासाठी आमचा लढा कायमस्वरूपी असेल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
हेही वाचा: सोलापूर जिल्ह्यातील निर्बंध उठणार! सहा तालुक्यातून कोरोना हद्दपार
कर्नाटकातील जनतेने कॉंग्रेसला मताधिक्य दिलेले असतानाही त्या ठिकाणी भाजपने षड्यंत्र रचून सत्ता मिळविली. आता आगामी काळात त्यांची सत्ता येणार नाही याची भीती भाजपला वाटू लागली आहे. दुसरीकडे देशभरात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडत आहेत. महागाईने उच्चांक गाठला असून सर्वसामान्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावर काहीच उपाय न काढता 'काश्मीर फाईल' चित्रपट टॅक्स फ्री करा, बेळगाव आमचाच भाग आहे, हिजाबवर बंदी, अशी वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा बेळगाव प्रश्न पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही भाजप नेत्यांनी त्यावर सावध भूमिका घेत कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी काय वक्तव्य केले, याची माहिती नसल्याचे सांगितले.
हेही वाचा: उन्हाळी सुटीत दररोज दोन तासांची शाळा! मुलांना लेखन-वाचनाचे धडे
महागाईपासून लक्ष विचलित करण्याचा डाव
अक्कलकोट, सोलापुरातील प्रत्येक व्यक्तीला वाटते आपण महाराष्ट्रातच असायला हवे. त्यामुळेच हा भाग महाराष्ट्रात राहिला. दुसरीकडे बेळगावमधील लोकांची इच्छा महाराष्ट्रात येण्याची आहे. तरीही, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे हे विधान म्हणजे देशातील वाढलेल्या महागाईवरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्लॅन आहे. कर्नाटकात आता कॉंग्रेसची सत्ता येईल, अशी भीती भाजपला वाटू लागल्याने त्यांनी हिजाब व बेळगाव प्रश्न उकरून काढला आहे.
- सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री, कॉंग्रेस
हेही वाचा: 'ग्लोबल टीचर'वर होणार शिस्तभंगाची कारवाई! शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला सीईओंकडे अहवाल
बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर पण सोडणार नाही
सोलापूर व अक्कलकोट, दक्षिण सोलापूर हा संपूर्ण भाग महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. बिदर, बेळगाव, निपाणी व कारवार हा महाराष्ट्राचा भाग कर्नाटकात गेल्यानेच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ निर्माण झाली. सोलापूर व अक्कलकोटचा एक इंच भागही कर्नाटकात जाऊ देणार नाही आणि बेळगावसह मराठी भाषिक असलेला कर्नाटकातील भाग महाराष्ट्राला जोडण्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. महागाईच्या प्रश्नावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपचे हे नवे कटकारस्थान आहे.
- पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
हेही वाचा: आजीच्या देखभालीसाठी आली अन् तरुणासोबत पळाली! 16 व्या वर्षी दिला मुलाला जन्म
सोलापूर, अक्कलकोट महाराष्ट्राचे अंग
महाराष्ट्र व कर्नाटक सीमावाद प्रकरणावर दोन्ही शासनाने कोणते निर्णय घेतले आहेत, याबाबत अधिक माहिती नाही. महाराष्ट्रापासून बेळगाव वेगळे करता येणार नाही. शासनाने कशापध्दतीने रिव्हेन्यू झोन केले आहेत, त्याचा नीट अभ्यास करावा लागेल. सोलापूर, अक्कलकोट हे तर महाराष्ट्राचे अंग आहेत.
- विक्रम देशमुख, शहराध्यक्ष, सोलापूर
Web Title: Congress Shiv Sena Aggressive Over Karnataka Maharashtra Border Disputesolapur Akkalkot Is Ours But We Will Not Leave Belgaum Nipani Karwar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..