शिवसेनेबाबतची भूमिका कॉंग्रेसने स्पष्ट करावी - तटकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 मार्च 2017

मुंबई - मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी शिवसेनेबाबतची भूमिका कॉंग्रेस स्पष्ट करावी, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी येथे केले.

मुंबई - मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी शिवसेनेबाबतची भूमिका कॉंग्रेस स्पष्ट करावी, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी येथे केले.

तटकरे म्हणाले, की जिल्हा परिषद सत्तेमध्ये कॉंग्रेस व आम्ही एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक जिल्हा परिषदांमध्ये आघाडीची सत्ता येणार आहे. या वेळी तटकरे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारविषयी भाष्य केले. ते म्हणाले, की 190 संख्या बळ असूनही हे सरकार हतबल आहे.

या सरकारमध्ये दोन वर्षांपासून शिवसेनेचा सहभाग आहे. तरीही शिवसेनेकडून या सरकारला टीकेला सामोरे जावे लागत आहे. तरीही शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल असे शक्‍य नाही, मात्र शिवसेनेने ठरवले तरच अविश्‍वास आणणे शक्‍य आहे. शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत असले, तरी आता शांत बसले आहेत.

Web Title: Congress should make clear the role of shivsena