"ते' सावरकर भाजपला मान्य आहेत का? : काँग्रेसचा प्रश्न

Congress Spokesperson Sachin Sawant Criticize on BJP Over Savarkar
Congress Spokesperson Sachin Sawant Criticize on BJP Over Savarkar

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शत्रूस्त्रीदाक्षिण्य या सद्गुणाला राष्ट्रघातक, कुपात्री व विकृत्ती असे संबोधून महाराजांचा अवमान करणारे सावरकर भाजपला मान्य आहेत का, असा सवाल कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा सावरकर व गोळवलकर यांनी केलेला अवमान कॉंग्रेस पक्ष कधीही विसरणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच सावरकरांबद्दल भाजपला आलेला कळवळा ही महाराष्ट्रात भाजपविरहित सरकार स्थापन झाल्याचा पोटशूळ असून त्यांचे सावरकर प्रेम हे राजकीय कावेबाजी असल्याचा टोमणाही सावंत यांनी मारला आहे.

धनंजय मुंडेची जागा रिक्त; 'या' नेत्याला मिळणार संधी

"मध्य प्रदेशमधील सेवादलाच्या एका घटकाने मर्यादित स्वरुपात वाटप केलेल्या माहिती पुस्तिकेतील काही मजकुराचे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस निश्‍चितच समर्थन करत नाही. कॉंग्रेस पक्षाचा सावरकरांच्या विचारांना असलेला विरोध हा वैचारिक असून तो व्यक्तिद्वेषातून खचितच नाही. सावरकरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती ही अप्रस्तुत आहे. कोणाचे व्यक्तिगत आयुष्य हे राजकीय चर्चेचा भाग कदापि असू नये, हीच कॉंग्रेस पक्षाची धारणा आहे,' असे सावंत यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com