esakal | शिवसेनेचा बाण काँग्रेसच्या हातातून सुटणार; पाठिंबा जाहीर?
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Support shiv sena in maharashtra

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा संघर्ष चालू असताना आज सत्ता स्थापनेचा हा संघर्ष संपला असं म्हणता येईल. आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

शिवसेनेचा बाण काँग्रेसच्या हातातून सुटणार; पाठिंबा जाहीर?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा संघर्ष चालू असताना आज सत्ता स्थापनेचा हा संघर्ष संपला असं म्हणता येईल. आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णमुळे महाशिवआघाडीचे राज्यात सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल

काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, काँग्रेस नेते के.सी.पाडवी, विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार या नेत्यांशी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री ?

काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याने शिवसेनेसोबत जाणार नाही असे बोलले जात असतानाच काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून पक्षाध्यक्ष सोनिया गांधी या तयार नव्हत्या. परंतु, सोनिया गांधी यांचे मन वळविण्यात राज्यातील नेते यशस्वी झाले आहेत. दरम्यान, आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना मिळून राज्यात सत्ता स्थापन करणार आहेत.

loading image