Amruta Fadnavis : 'अहो देवेंद्र भाऊ जरा बायकोला समजवा नाहीतर...काँग्रेसच्या महिला नेत्याचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadnavis

Amruta Fadnavis : 'अहो देवेंद्र भाऊ जरा बायकोला समजवा नाहीतर...काँग्रेसच्या महिला नेत्याचा इशारा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नागपुरमध्ये एका कार्यक्रमात 'महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत आणि मोदीजी नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असं माझं ठाम मत आहे. असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरूवात केली. काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी यांनी सुद्धा अमृता फडणवीस यांचा तिखट भाषेत चांगलंच समाचार घेतला आहे.

'अहो देवेंद्र भाऊ जरा बायकोला समजवा, आमचे राष्ट्रपिता एकच आहेत. आमचा एकच बाप आहे, दोन बाप नसतात हे आमचे संस्कार नाहीत', अशा शब्दात काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा संगिता तिवारी यांनी अमृता फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे. जर, अमृता फडणवीस यांना जर प्रसिद्धी हवी असेल, तर त्यांनी विवेक ओबेरॉय यांच्यासोबत अल्बम काढावा असा, घणाघातही संगीता तिवारी यांनी केला आहे.

हेही वाचा: खडसेंनी फडणवीसांना करुन दिली भीष्मप्रतिज्ञेची आठवण!

काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी म्हणाल्या की, 'अमृता वहिनी तुम्ही आज जे वक्तव्य केलं आहे, जुना बाप नवीन बाप, काय आहे हे..? अमृता वहिनी तुमच्यावरचे संस्कार आम्हाला माहित नाही. दोन बाप नसतात, बाप एकच असतो. आमच्यावर ते संस्कारही नाहीत. तुमच्यावरच्या संस्काराची चाचपणी करा', असंही संगीता तिवारी म्हणाल्या आहेत.

हेही वाचा: Devendra Fadnavis: त्यांचे लग्न, मुलगी झाली...खडसेंनी फडणवीसांना करुन दिली 'त्या' भीष्म प्रतिज्ञेची आठवण

पुढे त्या म्हणाल्या की, 'अहो देवेंद्र भाऊ जरा बायकोला समजवा, नाहीतर फार कठीण होईल, जर अमृता फडणवीस यांनी आपले शब्द मागे घेतले नाही तर, आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरू', असा इशाराही संगीता तिवारी यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

हेही वाचा: Disha Salian : आदित्य ठाकरे अडचणीत? 'त्या' प्रकरणाच्या चौकशीबाबत CM शिंदेंचं सूचक विधान