मालेगावात का उसळला हिंसाचार? जाणून घ्या बांगलादेश कनेक्शन | Malegaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Violence

मालेगावात का उसळला हिंसाचार? जाणून घ्या बांगलादेश कनेक्शन

मागच्या काही दिवसांमध्ये त्रिपुरात (Tripura) दोन समुदायांमध्ये तणाव वाढला आहे. त्रिपुरात मशिदीमध्ये (Mosque) नुकसान केल्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्याचे पडसाद शुक्रवारी महाराष्ट्रात (Maharashtra) उमटले. उत्तर त्रिपुरा जिल्ह्यात दोन ते तीन हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यामध्ये मोर्चेकऱ्यांनी मशिदीचं नुकसान केलं होतं. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी महाराष्ट्रात मुस्लिम संघटनांनी ठिकठिकाणी मोर्चे काढले होते. यावेळी हिंसाचार, तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.

या सर्व हिंसेचे मूळ बांगालदेशमध्ये आहे. बांगलादेशात नवरात्रौत्सवादरम्यान दुर्गा पूजेचे काही मंडप उद्धवस्त करण्यात आले होते. त्याच रागातून त्रिपुरामध्ये आयोजित केलेल्या मोर्चामध्ये मशिदीचं नुकसान करण्यात आले. त्याचे पडसाद शुक्रवारी महाराष्ट्रात उमटले.

हेही वाचा: जुही चावलाने अलिबागमध्ये विकत घेतली जमीन, किंमत ऐकून विस्फारतील डोळे

त्रिपुरात काय घडलं होतं?

ईशान्य भारतातील राज्य असलेल्या त्रिपुरामध्ये काही दिवसांपूर्वी तणाव निर्माण झाला होता. मशिदींवर हल्ले करण्यात आले. मुस्लिमांच्या संपत्तीचं नुकसान करण्यात आलं होतं. त्यावेळी तिथे सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तणावग्रस्त भागांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने आले होते.

हेही वाचा: मुंबई: नेस्को कोविड सेंटरमधील कोट्यवधीचं सामना काढलं बाहेर

बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यासाठी पोलीस परवानगी देत नव्हते, असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय. यावरुन हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. बांगलादेशात झालेल्या हिंसाचारात सात जणांचा मृत्यू झाला होता. मंदिरांमध्ये नासधूस करण्यात आली होती. हिंदू अल्पसंख्याक असलेल्या बांगलादेशात शेकडो घर आणि मालमत्तांचं नुकसान करण्यात आलं होतं.

त्रिपुरामध्ये भारतीय जनात पार्टीची सत्ता आहे. २५ वर्ष इथे कम्युनिस्टांची राजवट होती. २०१८ मध्ये भाजपाने डाव्यांचा पराभव करुन पहिल्यांदा त्रिपुरामध्ये सत्ता मिळवली.

loading image
go to top