‘संविधान संरक्षणासाठी अखेरपर्यंत लढत राहणार’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

कोरेगाव भीमा - पेरणे फाटा येथे विजयस्तंभस्थळी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण हे वाहतूक कोंडीमुळे सायंकाळी उशिरा आपल्या कार्यकर्त्यांसाठी विजयस्तंभस्थळी दाखल झाले.

कोरेगाव भीमा - पेरणे फाटा येथे विजयस्तंभस्थळी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण हे वाहतूक कोंडीमुळे सायंकाळी उशिरा आपल्या कार्यकर्त्यांसाठी विजयस्तंभस्थळी दाखल झाले.

या वेळी विजयस्तंभस्थळी अभिवादनासाठी जाण्यापूर्वी व नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. या वेळी कार्यकर्त्यांसमोर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘दलित, मराठा, बहुजन एकसारखे असून, त्यांच्या समन्वयासाठी व संविधान संरक्षणासाठी अखेरपर्यंत लढत राहणार आहे. महाराष्ट्रात मनुवादी सरकार मात्र त्यांच्यात मतभेद निर्माण करत आहे. सर्व समविचारी घटकांना एकत्र करून सरकार उखडणार आहे. शौर्यभूमी असलेल्या विजयस्तंभस्थळी शेवटच्या श्वासापर्यंत येतच राहणार आहे.’’

ग्रामस्थांचे कौतुक
पेरणे फाटा येथे विजयस्तंभस्थळी मंत्री राजकुमार बडोले व दिलीप कांबळे यांनीही भेट देऊन अभिवादन केले. या वेळी ते म्हणाले, ‘‘आजच्या शौर्य दिनाच्या निमित्ताने या 
परिसरातील स्थानिक ग्रामस्थांचे सौजन्य व समन्वयाचे वातावरण; तसेच ग्रामस्थांची एकात्मता कौतुकास्पद आहे. त्यामुळेच कार्यक्रम शांततेत पार पडला. आजच्या या यशाचे श्रेय स्थानिक घटकांबरोबरच प्रशासनाच्या व्यवस्थेलाही आहे.’’

Web Title: The Constitution will protect against the end says Bhim Army chief Chandrashekhar Azad