राज्यभरात पावसाची संततधार

गुरुवार, 5 जुलै 2018

राज्यात सध्या समाधानकारक पाऊस पडत असून, दिवसभरात राज्यातील विविध भागात दिवसभर पावसाच्या सरी येत होत्या. तर सकाळी पुण्यामध्ये पावसाचा जोर होता. पावसाने हजेरी लावलेल्या भागात पेरण्यांच्या कामाला आणखी वेग येणार आहे. जुन्नर तालुक्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर, पुणे जिल्ह्यातील पुरंदर, मावळ, वेल्हे, भोर तालुक्यातही कमीअधिक प्रमाणात पावसाच्या सरी जोर धरत आहेत.

पुणे- राज्यात सध्या समाधानकारक पाऊस पडत असून, दिवसभरात राज्यातील विविध भागात दिवसभर पावसाच्या सरी येत होत्या. तर सकाळी पुण्यामध्ये पावसाचा जोर होता. पावसाने हजेरी लावलेल्या भागात पेरण्यांच्या कामाला आणखी वेग येणार आहे. जुन्नर तालुक्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर, पुणे जिल्ह्यातील पुरंदर, मावळ, वेल्हे, भोर तालुक्यातही कमीअधिक प्रमाणात पावसाच्या सरी जोर धरत आहेत.

उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी समाधानकारक पाऊसाला सुरवात झाली आहे. जळगांव जिल्ह्यातील काही परिसरात सकाळ पासुन अधुन मधुन पावसाच्या सरी पडत आहेत. शेतात गेलेले बहुतांश मजुर या रिपरिप पावसामुळे घरी परतले आहेत. नाशिक जिल्ह्यातही चांगल्या पावसाला सुरवात झाली असून जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातदेखील आज पहाटेपासून पावसाला सुरवात झाली असून, सातारा शहर आणि परिसराला आज पहाटेपासून पावसाने झोडपून काढले. 
त्याचबरोबर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

सगळीकडे पावसाला समाधानकारक सुरवात झालेली असताना मराठवाड्यातील परिस्थिती मात्र, गंभीर आहे. मराठवाड्यात पावसाची नुसतीच भुरभुर असुन, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. विदर्भातही अशाच स्वरुपाची परिस्थिती असून, तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी झाल्या आहेत. विदर्भात उनपावसाचा एकप्रकारे लपंडाव सुरु आहे.

Web Title: continious raining in the state