Sushma Andhare: अंधारे VS शिरसाट यांच्यातील वाद सुरूच, शिरसाटांनी शेअर केला अंधारेंचा 'तो' Video

अंधारेंनी शिरसाटांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकल्यानंतर शिरसाटांनी अंधारेंचा व्हिडिओ केला शेअर
Sanjay Shirsath press conference alligation on Sushma Andhare
Sanjay Shirsath press conference alligation on Sushma Andhare Sakal

छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यामधील वाद सुरूच असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटात येताच विविध मंदिरांमध्ये पूजा-आरतीला उपस्थित राहणाऱ्या सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात येण्याच्या काही वर्षांपूर्वी देवीभक्त महिलांची कशी खिल्ली उडवली होती, नवरात्रीत उपवास करणाऱ्या महिलांबाबत त्यांचे काय विचार होते, हे दाखवणारा व्हिडिओ आमदार संजय शिरसाट यांनी शेअर केला आहे.

आधी हिंदु देवी-देवतांची टिंगल आणि आता चक्क देवीची आरती करणाऱ्या सुषमा अंधारे यांची दुटप्पी भूमिका दर्शवणारे दोन व्हिडिओ संजय शिरसाट यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. सुषमा अंधारे यांचे हे व्हिडिओ आता नव्याने शेअर केले जात आहेत. कालच सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्याविरोधात ३ रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

संजय शिरसाट यांनी शेअर केलेल्या अंधारेंच्या त्या व्हिडिओत काय आहे?

संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांचा काही वर्षांपूर्वीचा आणि काही महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या दोन्ही व्हिडिओमध्ये प्रचंड विरोधाभास दिसून येत आहे. पहिल्या व्हिडिओत सुषमा अंधारे यांनी नवरात्रीत उपवास करणाऱ्या, पायात चप्पल न घालणाऱ्या, गादीवर न बसणाऱ्या महिलांची खिल्ली उडवल्याचे दिसते. तर दुसऱ्या व्हिडिओत सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत (ठाकरे गटात) प्रवेश केल्यानंतर त्यांची भूमिका कशी बदलली आहे हे दिसून येते. देवीच्या मंदिरात आरती करतानाचा दुसरा व्हिडिओ आहे.

Sanjay Shirsath press conference alligation on Sushma Andhare
Shivsena: ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण Video Viral

आमदार संजय शिरसाट आणि सुषमा अंधारे यांच्यातील वाद काय आहेत?

संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सुषमा अंधारे तसेच महिला आयोग आक्रमक झाला होता. सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्या या वक्तव्याविरोधात तीन शहरांमध्ये गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र परळी, संभाजीनगर आणि पुणे या तिन्ही शहरात शिरसाट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही.

काल अखेरीस सुषमा अंधारे यांनी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात शिरसाट यांच्याविरोधात ३ रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. महिला आयोगानेही पोलिसांकडून शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याच्या ध्वनिचित्रफिती मागवल्या आहेत.

Sanjay Shirsath press conference alligation on Sushma Andhare
Maharashtra Politics: गुलाबराव पाटीलांची मविआवर खालच्या शब्दात टीका म्हणाले, 'तीन जणांची माय...'

दरम्यान, आमदार संजय शिरसाट देखील त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. मी कोणतंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केल्यानंतर मीसुद्धा बोलू शकतो. मलाही माहिती आहे. ज्या वक्तव्याबद्दल आक्षेप घेतला जातोय, ते वक्तव्य मी आमच्या आमदारांना उद्देशून म्हटलो होतो. मी एकही अश्लील शब्द वापरला नाही, असं स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेतून दिलं होतं.

Sanjay Shirsath press conference alligation on Sushma Andhare
Karnatak Election: कर्नाटकमधील निवडणुकीच्या तोंडावर CM शिंदेंचे सीमाभागातील नागरिकांना मोठं गिफ्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com