Video: PM मोदींना जिरेटोप घातल्याने वाद पेटला! संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार गट आक्रमक

Controversy of wearing a jiretop: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप घातला होता
PM MODI
PM MODI

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप घातला होता. यावरुन राजकीय वातावरण तापू लागलं आहे. पंतप्रधान मोदी यांना जिरेटोप घालण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आणि संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. छत्रपत्री शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचं म्हणत शरद पवार गटाने टीका केली आहे.

शरद पवार गटाच्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवरुन यासदंर्भात पोस्ट करण्यात आली आहे. यात म्हणण्यात आलंय की,'जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे.'

PM MODI
PM Narendra Modi: मोदींच्या डोक्यावर शिवशाही जिरेटोप ! वाराणसीमधील उमेदवारी अर्जानंतर प्रफुल्ल पटेलांनी केला सत्कार

महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही!, असं शरद पवार गटाकडून म्हणण्यात आलंय.

PM MODI
Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांचा जिरेटोप घालून सत्कार करणे त्यांच्या चांगलंच अंगलट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. हिंदू महासभेने देखील यावर आक्षेप घेतला आहे. हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी यावरुन प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे. इतकी लाचारी कुठून आली. उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर बसवणार का? असा सवाल दवे यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com