सर्वाधिक सक्रिय रुग्णांमध्ये मुंबई शहर अव्वल; पुणे दुसऱ्या क्रमांकावर

सार्वजनिक आरोग्य विभागाचा अहवाल
corona update
corona updatesakal media

मुंबई : मुंबईतील कोरोना संसर्ग (corona infection) तसेच सक्रिय रुग्णसंख्या (corona active patients) कमी होत असली तरी राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणारे मुंबई अव्वल (Mumbai ranks first) शहर ठरलं आहे. यापूर्वी सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेलं पुणे शहर (Pune city) दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. त्यांनी आपल्या सक्रिय रुग्णसंख्या कमी करण्यात यश मिळवले आहे. मुंबईत 2519 सक्रिय रुग्ण आहेत.

corona update
पंतप्रधानांच्या सुरक्षेत असणाऱ्या SPG कमांडोच्या पर्सची चोरी करणारा ताब्यात

राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये मुंबईत सर्वाधिक सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुणे 1,974 सह दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात पुण्यामध्ये सर्वाधिक 4,250 होते तर मुंबईत 3,204 सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती. मुंबईत 17 नोव्हेंबर पर्यंत 3,568 तर पुण्यामध्ये 2882 सक्रिय रुग्ण होते. 24 नोव्हेंबर पर्यंत त्यात घट होऊन सक्रिय रुग्णांची संख्या मुंबईत 2,519 पर्यंत खाली आली. तर पुण्यातील सक्रिय रुग्णसंख्या 1974 पर्यंत खाली आली. या दरम्यान मुंबईत 1049 तर पुण्यामध्ये 908 ने रुग्णासंख्या घटली.

सध्या राज्यात 9,366 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 6,988 (74.61) सक्रिय रुग्ण केवळ मुंबई, पुणे,ठाणे, अहमदनगर,रायगड या पाच जिल्ह्यांमध्ये आहेत. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्ये पैकी 26.90 टक्के रुग्ण मुंबईत तर 21.08 टक्के रुग्ण पुण्यामध्ये आहेत.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण

जिल्हा सक्रिय रुग्ण टक्के

मुंबई - 2519 26.90

पुणे - 1974 21.08

ठाणे - 1107 11.82

अहमदनगर - 991 10.58

रायगड - 397 4.24

"राज्यभरातील सक्रिय रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. मुंबईत दररोज बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या अधिक असल्याने रुग्णांमध्ये भर पडते. मात्र मुंबईसह सर्वच जिल्ह्यांतील सक्रिय रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने चिंता करण्याचे कारण नाही."

-डॉ.अविनाश सुपे , सदस्य , राज्य टास्क फोर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com