पंतप्रधानांच्या सुरक्षेत असणाऱ्या SPG कमांडोच्या पर्सची चोरी करणारा ताब्यात

thief arrested
thief arrestedsakal media

मुंबई : पंतप्रधानांच्या सुरक्षेतील (prime minister security) एसपीजी कमांडोची (SPG commando) पर्स मुंबईतल्या लोकलमधून चोरीला गेल्याची (robbery in train) घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. अंधेरी रेल्वे पोलिसांनी (Andheri railway police) सात दिवसांत चोराला पकडलं (thief arrested) पण तोपर्यंत चोरानं पर्समधली कॅश आणि कार्डसमधून हजारो रुपये खर्च केले होते.

thief arrested
वर्गमित्राच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; दोन जणांविरोधात गुन्हा

पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात असताना अत्यंत काटेकोरपणे लक्ष देणाऱ्या एसीपीजी कमांडोला मुंबईतल्या एका चोरांनं मात्र गंडा घातलाय. सुभाष चंद्रा असं एसपीजी कमांडोचं नाव आहे, गेली तीन वर्ष ते पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात आहेत. सुभाष चंद्रा काही दिवसांपूर्वी मुंबईत फिरायला आले होते. मात्र मुंबईतला त्यांचा मुक्काम काही चांगला झाला नाही. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकच्या प्रवासाचा त्यांना अनुभव घ्यायचा होता, पण मुंबईच्या लोकलमध्ये त्यांना आलेला अनुभव मात्र त्यांच्या चांगलाच लक्षात राहील असा होता. 17 नोव्हेंबर ला त्यांनी विलेपार्लेहून महालक्ष्मीला जाण्यासाठी लोकल ट्रेन पकडली.

त्याच दरम्यान एका चोरानं त्यांच्या खिशातून त्यांची पर्स लंपास केली. अंधेरी स्टेशनच्या जवळपास आल्यावर ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ अंधेरी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. अंधेरी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीनं तपासाला सुरुवात केली. आणि काही दिवसांत चोराला पकडण्यात त्यांना यशही आलं. पर्स मिळाली, पण तोपर्यंत त्यातली रोख रक्कम आणि त्यात असणाऱ्या डेबिट आणि क्रेडीट कार्डमधून बराच पैसा चोरानं खर्च केला होता.

चोर होता सराईत गुन्हेगार

चोराला पकडल्यावर त्याची चौकशी कराताना तो एक सराईत गुन्हेगार असुन त्याचे काही साथीदारही त्याच्यासोबत हे काम करतात अशी माहीती पोलिसांना मिळाली. मुंबईत बऱ्याच ठिकणी त्याच्यावर अशाच प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असल्याचंही समोर आलंय. त्याच्या साथीदारांचाही पोलीस शोध घेतायेत. पोलिसांना त्याच्याकडून जवळपास 300 क्रेडीट आणि डेबिट कार्डस, स्वाईप माशिन असा मुद्दोमाल मिळालाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com