esakal | राज्यात संसर्ग वाढतोय! दिवसभरात ९००० नव्या रुग्णांची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Corona Update

राज्यात संसर्ग वाढतोय! दिवसभरात ९००० नव्या रुग्णांची नोंद

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्यात दिवसभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्यानं पुन्हा एकदा चिंतेच वातावरण झालं आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, चोवीस तासात राज्यात ९००० नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १८० रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे. (corona Infection risen in Maharashtra Record 9000 new patients aau85)

राज्यात गेल्या चोवीस तासात ९००० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५,७५६ कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच राज्यात सध्या १,०३,४८६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दिवसभरात १८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९६.२४ इतका झाला आहे. राज्यात आजवर ४,५४,८१,२५२ नमुन्यांची तपासणी झाली असून यांपैकी ६२,१४,१९० जण पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईची कोरोना आकडेवारी

मुंबई शहरात गेल्या चोवीस तासात ४५४ नवे रुग्ण आढळून आले. तर ५१२ रुग्ण बरे झाले आहेत. शहरात आजवर ७,०६,५५२ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे मुंबईची रिकव्हरी रेट ९७ टक्के झाला आहे. शहरात सध्या ६,५४४ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर १००१ दिवसांवर पोहोचला आहे. तर रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्के झाला आहे.

loading image