esakal | 'कोरोना हे थोतांड आहे'; संभाजी भिडेंचं पुन्हा अजब विधान
sakal

बोलून बातमी शोधा

'कोरोना हे थोतांड आहे'; संभाजी भिडेंचं पुन्हा अजब विधान

'कोरोना हे थोतांड आहे'; संभाजी भिडेंचं पुन्हा अजब विधान

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: शिवप्रतिष्ठान हिंदूस्तान या संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. येनकेन कारणाने ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी अलिकडेच कोरोना संदर्भात केलेली वक्तव्ये चांगलीच वादग्रस्त ठरली आहेत. संभाजी भिडे यांनी आता आपल्या या वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकेत आणखी भर घातली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोरोना हे स्पष्टपणे थोतांड असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा: "PM मोदींच्या हट्टामुळे शेतकऱ्याला रस्त्यावर बसावं लागलं"

त्यांनी म्हटलंय की, कोरोना म्हणजे थोतांड आहे. आणि हे शासन हा थोंताडपणा वाढवत आहे. लॉकडाऊन लावल्यामुळेच अधिक नुकसान होत आहे. सगळं मोकळं करु देत, काहीही देशात वाटोळं होणार नाही. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जेवढं नुकसान झालंय, त्याच्या एक अब्जांश देखील वाटोळं होणार नाही. सरकार लॉकडाऊन लावतंय ते 100 टक्के चूकच आहे.

हेही वाचा: लोकल तातडीने सुरु करा, प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

पुढे त्यांनी कोरोनामुळे मंदीर बंद असण्याच्या मुद्यावर म्हटलंय की, देव सध्या कुलूपबंद आहेत. गावोगावचे लोक कुलूप तोडून टाकू. माझं केवळं महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या संबंध देवभक्तांना आवाहन आहे की, खरंच देवभक्त असाल तर हे कुलूप तोडून आत जाऊयात, असं आवाहनही त्यांनी सच्च्या देवभक्तांना केलं आहे.

loading image