esakal | लोकल तातडीने सुरु करा, प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

लोकल तातडीने सुरु करा, प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

लोकल तातडीने सुरु करा, प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

sakal_logo
By
रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: लसीचे दोन डोस घेतलेल्या (vaccination) नागरिकांना लोकल प्रवासाची (Mumbai local) परवानगी दिली नाही, तर आंदोलन उभारण्याचा इशारा भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी काल दिला. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (uddhav thackeray) रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) आणि मंत्री विजय वेडट्टीवार यांना पत्र लिहून लोकल सुरु करण्याची मागणी केली आहे. (Start Mumbai local immediately pravin darekar letter to cm uddhav thackeray)

"मुंबईचा पॉझिटीव्हिटी दर कमी आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी तातडीने लोकल सुरू करावी. कल्याण-डोंबिवलीहून खाजगी वाहनाने मुंबईत येण्यासाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागतात, त्यामुळे चाकरमान्यांचे हित लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घ्यावा!" असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: अमित शाहांच्या सहकार खात्यावर संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया

"कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या चाकरमान्यांना लोकल प्रवासाची अनुमती मिळावी" अशी दरेकरांची मागणी आहे. "खाजगी कर्मचारी आणि लसीकरणासाठी मुंबईत दाखल होणाऱ्या जनसामान्यांसाठी लोकल ट्रेन तातडीने सुरू करा" असे दरेकरांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा: भेंडी बाजारात दुकानं उघडी असतात, मग फक्त हिंदुंच्या वस्तीत कारवाई का? - संदीप देशपांडे

"डोंबिवलीतून, कल्याणहून मुंबईत येण्यासाठी टॅक्सी आणि खाजगी वाहनांमधून लोकांना ७०० रुपये मोजावे लागतात" असं दरेकरांनी म्हटलं आहे. मुंबईत कोरोनाची स्थिती (corona situation) आता पूर्णपणे नियंत्रणात आली असून रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे.

नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी आहे. पण अजूनही मुंबई लेव्हल तीनमध्येच (level three) आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि व्यापारी वर्गामध्ये (traders) संतापाची भावना आहे. मुंबईची जीवनवाहिनी (Mumbai lifeline) असलेली लोकल सेवा अजूनही सर्वसामान्यांसाठी सुरु झालेली नाही.

loading image