कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील पर्यटन उद्योगाला फटका

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात पर्यटन उद्योगातील सुमारे दीड हजार कोटींची वार्षिक उलाढाल ठप्प झाली आहे.
Maharashtra Tourism
Maharashtra TourismSakal

पुणे - कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे राज्यात पर्यटन (Tourism) उद्योगातील सुमारे दीड हजार कोटींची वार्षिक उलाढाल (Transaction) ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) (MTDC) आणि पर्यटन संचालनालय यांच्या वतीने पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांचे सर्वेक्षण (Survey) करण्यात येणार आहे. पर्यटन उद्योगाला सावरण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार आहेत. तसेच, पर्यटन धोरण निश्चित करण्यासाठी हा सर्व्हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गेल्या वर्षभरात हवाई वाहतूक बंद असल्यामुळे विदेशी पर्यटक (Foreign Tourist) आलेले नाहीत. मर्यादित रेल्वे सुविधांमुळे देशांतर्गत पर्यटन ठप्प आहे. जिल्हा बंदी आणि स्थानिक पातळीवरील लॉकडाउनमुळे (Lockdown) प्रवासी वाहतूक थांबली आहे. (Corona outbreak hits tourism industry)

यामुळे लॉजिंग, रेस्टॉरंट, प्रेक्षणीय स्थळांकडे पर्यटक फिरकलेच नाहीत. पर्यटनावर आधारित व्यापारही ठप्प आहे. पर्यटनस्थळांच्या परिसरातील बाजारपेठाही ओस पडल्या आहेत. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातील सुमारे दीड ते दोन हजार कोटींची वार्षिक उलाढाल थंडावली आहे. संचारबंदी आणि निर्बंधांमुळे अनेकांचा रोजगार बुडाला. त्यातून जगण्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. अशा स्थितीत पर्यटन व्यवसायास किती लोक जोडले आहेत, त्यापैकी कोणाचे किती नुकसान झाले, याबाबत अद्याप कधीही सर्व्हे झालेला नाही. त्यामुळे या व्यवसायाला सावरण्यासाठी उपाययोजना आखता आल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर निर्बंधांमुळे झालेले नुकसान आणि पर्यटन क्षेत्र सावरण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी हा सर्व्हे करण्यात येणार आहे.

Maharashtra Tourism
हरायचं नाही...लढायचं! एकाच कुटुंबातील 5 जण कोरोनामुक्त

या बाबींचे होणार सर्वेक्षण -

हॉटेल व्यावसायिक, रेस्टॉरंट, यात्री निवास, निवास न्याहारी योजना, कृषी पर्यटन केंद्र, निसर्ग पर्यटन केंद्र, वॉटर पार्क, टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कंपन्या एजंट, वाहतूकदार कंपन्या, बोटिंग क्लब, पर्यटन खेळ सुविधा पुरवठादार, गाइड, स्टॉल्सधारक. याबाबत संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पर्यटन उद्योगातील अडचणी समजून घेण्यासाठी ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात पर्यटक, त्यावर अवलंबून व्यवसाय, त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, मनुष्यबळ आणि नुकसानीचे स्वरूप याचा समावेश आहे. या माध्यमातून प्राप्त माहितीच्या आधारे उपाययोजना करून पर्यटन क्षेत्राला सावरण्याचा प्रयत्न राहील.

- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी

सर्व्हेची लिंक - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScZgZy3jnWplAiZgjkB1DKy9LtJfczhAbEAQ2OmkV-C7h96eQ/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com