esakal | हरायचं नाही...लढायचं! एकाच कुटुंबातील 5 जणांची कोरोनावर मात

बोलून बातमी शोधा

5 members of the same family Recovered Form Corona
हरायचं नाही...लढायचं! एकाच कुटुंबातील 5 जण कोरोनामुक्त
sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

वाघोली (Pune): ''त्रास सुरू झाल्यानंतर डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घेऊन लगेच एका पाठोपाठ एक, एकाच रुग्णालयात(Hospital) दाखल झालो. एकमेकांना आधार दिला, खूप सकारात्मक विचार ठेवले, त्यामुळे 75 वर्ष वयाच्या आईसह आम्ही पाच ही जण कोरोनामुक्त ( (Recovered Form Corona) झालो'', असे सांगत होते बकोरी (ता. हवेली Haveli) येथील पर्यावरणप्रेमी चंद्रकांत गोविंद वारघडे.

हेही वाचा: जेईई मुख्य परीक्षा, मे २०२१ स्थगित; शिक्षण मंत्र्यांची घोषणा

चंद्रकांत यांची मुलगी धनश्री वय 21) हिला प्रथम त्रास झाला. ताप आल्याने कोरोनाचा संशय आला. तिची चाचणी करून तिच्यावर लगेच उपचार सुरू केले. मात्र, दोन दिवसात त्रास कमी न झाल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. मग सर्वांच्याच चाचण्या केल्या. आई कमल व पत्नी माया (वय 40) यांनाही त्रास झाल्याने त्यांना ही त्यांनी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान त्यांना व मुलगा धनराज ( वय 21 ) यांनाही त्रास होऊ लागला. मग मुलालाही त्यांनी दाखल केले. ते मुद्दाम सगळ्यात शेवटी दाखल झाले. ते आधी दाखल झाले असते तर कुटुंबीय खचले असते. यासाठी त्यांनी तो निर्णय घेतला. एकाच रुग्णालयात असल्याने थोडा धीर होता. त्यांना काळजी आईची होती. मात्र प्रत्येकाने एकमेकाला धीर दिला. खूप सकारात्मक राहिले. यामुळे पाचही जण कोरोनातून मुक्त झाले. एकाच वेळी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

चंद्रकांत वारघडे यांना पर्यावरणाची खूप आवड असून त्यांनी बकोरी येथील डोंगरावर हजारो झाडे लावली आहेत. त्याचे संगोपन ते कुटुंबियासाहित करतात.

हेही वाचा: भारती म्हणते, कोरोनात 'चान्स' नकोच, रिस्कीये...

'मुळात अशी वेळ कोणत्याही कुटुंबावर येऊ नये. त्रास जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. घाबरून जाऊ नका. खूप सकारात्मक रहा. अन्य कुटुंबीय व मित्रांनीही खूप आधार दिला. यामुळे कोरोनातून मुक्त झालो. कळकळीची विनंती आहे. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टनसिंग या त्रिसूत्रीचा वापर करा.''

- चंद्रकांत वारघडे

हेही वाचा: अमोल काकांनी करुन दिला शिवरायांच्या जीवन चरित्राचा परिचय

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा