राज्यात कोरोनाचा उद्रेक! आज विक्रमी रुग्णांची नोंद... वाचा आकडेवारी सविस्तर

मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

: राज्यात पुन्हा एकदा दिवसभरात 9518 रुग्णांची विक्रमी नोंद झाली. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 3,10,455  झाली आहे.

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा दिवसभरात 9518 रुग्णांची विक्रमी नोंद झाली. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 3,10,455  झाली आहे. तर आज 258 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 11,854 वर पोहोचला आहे. राज्यात आज रोजी एकूण 1,28,730 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.        

वरवरा राव यांना नानावटी रुग्णालयात हलवले; मानवाधिकार आयोगाने राज्याला दिले होते आदेश...                

आज 3,906 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत 1,69,569 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.62 % एवढे झाले आहे.आज राज्यात एकूण 258 मृत्यूंची नोंद झाली. त्यापैकी मुंबई 64, ठाणे जिल्हा 85, पुणे मंडळ 52, औरंगाबाद मंडळ 7,कोल्हापूर 9, लातूर मंडळ 5 ,अकोला मंडळ 4 ,नागपूर 7 येथील मृत्यूचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.82 % एवढा आहे.           

कोर्टात खटल्याचे काय चालु आहे कळत नाही; मग ही बातमी तुमच्यासाठी..

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 15,64,129  नमुन्यांपैकी 3,10,455 ( 19.85 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 7,54,370 लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 45,846 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

------------------------------------------

Edited by Tushar Sonawane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona outbreak in the state! Record number of patients recorded today ... Read statistics in detail