Corona Update : राज्यात 960 नवीन रुग्ण तर 41 रुग्णांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahrashtra

Corona Update : राज्यात 960 नवीन रुग्ण तर 41 रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मंगळवारच्या तुलनेत बाधित रुग्ण तसेच मृत्यूचे प्रमाण वाढले. राज्यात 41 रुग्ण दगावले असून मंगळवारी 19 रुग्ण दगावले होते. दैनंदिन रुग्णसंख्या ही 766 वरून 960 झाली आहे. तर आज 1043  बाधित रुग्ण बरे झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,78,422 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.68 % एवढे झाले आहे.

राज्यातील मृतांचा एकूण आकडा 1,40,807 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 9366 इतकी आहे.आज 960 रुग्णांसह  करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,32,257 झाली आहे.    

हेही वाचा: नवी मुंबईत करोना रुग्णसंख्या आटोक्यात

कोल्हापूर,औरंगाबाद,लातूर, अकोला,नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 15,नाशिक 6,पुणे 20 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 84,261 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1084 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image
go to top