esakal | Corona Update : राज्यात अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Corona Update

Corona Update: राज्यात अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात दिवसभरात 6,269 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 62,58,079 वर पोहोचली आहे. राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 93,479 इतकी आहे. आज दिवसभरात 7,332 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 60,29,817 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.35 टक्के एवढे झाले आहे. (Corona Update decrease number of active corona patients in maharashtra aau85)

हेही वाचा: JEE 2021: पूरस्थितीमुळं परीक्षेला मुकलेल्यांना मिळणार पुन्हा संधी

राज्यात पुन्हा मृत्यूचा एकदा वाढला असून आज 224 कोविड बाधित रुग्ण दगावले. मृतांचा एकूण आकडा 1,31,429 वर पोहोचला आहे. आज ही ठाणे मंडळात सर्वाधिक 86 तर पुणे मंडळात 70 मृत्यूची नोंद झाली. तर औरंगाबाद 5, कोल्हापूर 36, नाशिक 13, नागपूर 15, अकोला 8 व लातूर मंडळ 5 मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के इतका आहे.

सर्वाधिक मृत्यू

जिल्हे मृत्यू

रायगड 53

पिंपरी चिंचवड मनपा 30

सातारा 18

वसई विरार मनपा 13

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,66,44,448 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,58,079 (13.42 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,27,754 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,621 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image
go to top