Corona Update: राज्याला मोठा दिलासा; रुग्णसंख्येसह मृतांमध्ये घट

कालच्या तुलनेत दुपट्टीहून अधिक मृत्यू घटले
corona update
corona updatesakal
Updated on

मुंबई : कोरोना संसर्गाची आजची आकडेवारी राज्याला मोठा दिलासा देणारी ठरली आहे. कारण राज्यात दिवसभरात नव्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली तसेच मृत्यूंमध्येही मोठी घट झाली आहे. दिवसभरात ३,७४१ रुग्ण आढळून आले तर ५८ जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

राज्यातील रुग्णसंख्येय काहीशी कमी झाली असून आज दिवसभरात 3,741  नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 64,60,680 झाली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी वाढून 51,834 इतकी झाली. तर आज दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या वाढली असून आज 4,696 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62,68,112 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.2 टक्के एवढं झालं आहे.

राज्यात मृत्यूचा आकडा बराच कमी झाला असून आज 52 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली. रविवारी 131 रुग्ण दगावले होते. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,37,209 इतका झाला आहे. अकोला, औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर पुणे मंडळात 22 मृत्यूची नोंद झाली. ठाणे 14, नाशिक 1, कोल्हापूर 12, लातूर 2, नागपूर 1 मृत्यू नोंदवले गेले. 

corona update
ठाणे : फेरीवाल्याने छाटली सहायक आयुक्तांची बोटे

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,38,12,827 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,60,680 (12.01 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,88,489 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 2,299 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Speaking at Sakal Bhakti Shakti Vyaspeeth, Dr More highlighted the contribution of saints in shaping Maharashtra's social and cultural legacy.
Marathi News Esakal
www.esakal.com