esakal | Corona Update: राज्यात दिवसभरात ८,४१८ नव्या रुग्णांची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

maha_covid

Corona Update: राज्यात दिवसभरात ८,४१८ नव्या रुग्णांची वाढ

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत कालच्या तुलनेत आज काहीशी वाढ झाली. आज नव्यानं ८,४१८ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर १०,५४८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात ८,४१८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर राज्यात उपचार घेत असलेले १०,५४८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १७१ रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६१,१३,३३५ झाली असून आत्तापर्यंत ५८,७२,२६८ रुग्ण बरे झाले आहेत. तर आजवर १,२३,५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या राज्यात १,१४,२९७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईतील कोरोनाची आकडेवारी

मुंबई शहरात दिवसभरात ४५३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाचा रिकव्हरी रेट ९६ टक्के इतका झाला आहे. आजवर शहरातील ६,९९,८२३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरात ७,९०८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

loading image