esakal | Corona Update: राज्यातील रुग्णसंख्या वाढ स्थिरतेकडे; बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त

बोलून बातमी शोधा

coronavirus_gen_jpg.jpg

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढ स्थितरतेकडे जात असल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्या 60 ते 70 हजारांच्या आसपास आहे

Corona Update: राज्यातील रुग्णसंख्या वाढ स्थिरतेकडे
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

मुंबई- महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढ स्थितरतेकडे जात असल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्या 60 ते 70 हजारांच्या आसपास आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 66 हजार 159 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तर 771 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 6 लाख 70 हजार 301 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 68 हजार 534 कोरोना रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आली आहे. आरोग्य विभागाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी पुणे मनपा येथे सर्वाधिक 94 मृत्यूंची नोंद झाली असून, मुंबई मनपा 82, नागपूर मनपा 42 येथे नोंदवण्यात आले. मृत्यूचा दर 1.5 % इतका आहे. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 45,39,553 झाली आहे. आज नोंद झालेल्या 771 मृत्यूंपैकी 383 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 265 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.तर 223 मृत्यू हे आठवड्यापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. राज्यात आज रोजी एकूण 6,70,301 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा: 'सीरम'पाठोपाठ 'भारत बायोटेक'नेही कमी केली कोरोना लशीची किंमत

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,68,16,075 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 45,39,553 (16.93 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 41,19,759 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 30,118 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दिवसभरात 68,537  रुग्ण कोरोनामुक्तआज 68,537 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 37,99,266 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.69 % एवढे झाले आहे.