esakal | Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून स्थिर असून मृतांमध्ये किंचित वाढ झाली आहे. त्याचबरोबर नव्या रुग्णांच्या तुलनेत निम्मे रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात ४,१३० नवे रुग्ण आढळून आहे. तसेच २,५०६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, दिवसभरात कोरोनाच्या ६४ रुग्णांचा मृत्यू झाला, या आकड्यात कालच्या तुलनेत काहीशी वाढ झाली आहे. तसेच राज्यात सध्या ५२,०२५ अॅक्टिव्ह रुग्ण असून आजवर ६२,८८,८५१ रुग्ण बरे झाले आहेत. तर आजवर १,३७,७०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईची कोरोना स्थिती अशी...

मुंबई शहरात दिवसभरात ४१६ नवे रुग्ण आढळून आले. तर ३८२ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे शहरातील बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७,२३,८४० वर पोहोचली. तसेच मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण ९७ टक्के झालं आहे. तसेच शहरात सध्या ३,५६१ एकूण सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण दुपट्टीचा दर १,३७९ दिवस आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर ०.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

loading image
go to top