esakal | Corona Update: राज्यात दिवसभरात ४,१७४ रुग्णांची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Corona patients

Corona Update: राज्यात दिवसभरात ४,१७४ रुग्णांची नोंद

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्यात आज पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली. त्यानुसार दिवसभरात ४१७४ नवे रुग्ण आढळून आले तर ४,१५५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, ६५ रुग्णांचा आज मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

आरोग्य विभागानुसार, आजच्या रुग्णवाढीनंतर राज्यात एकूण रुग्णांची संख्या ६४,९७,८७२ इतकी झाली आहे. त्यामुळे एकूण पॉझिटिव्हिटी रेट ११.७४ वर पोहोचला. तर दिवसभरातील मृत्यूंच्या संख्येमुळं राज्याचा मृत्यूदर २.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच ६३,०८,४९१ रुग्णांना आजवर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट ९७.०९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

हेही वाचा: Podcast: अफगाणिस्तानचा पंतप्रधानच दहशतवादी ते क्रिकेटच्या गब्बरचा घटस्फोट

दरम्यान, राज्यात सध्या ३,०७,९१३ रुग्ण होम क्वारंटाइन आहेत तर १,९३७ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइन झाले आहेत. तर राज्यात सध्या ४७,८८० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

loading image
go to top