esakal | COVID19 | राज्यात दिवसभरात २,३८४ रुग्णांची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

covid19

COVID19 | राज्यात दिवसभरात २,३८४ रुग्णांची नोंद

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : देशभरातील कोरोना संसर्गाची आकडेवारी पाहता दुसरी लाट पूर्णपणे ओसल्यात जमा झाली असताना राज्यातही संसर्गात मोठी घट झाली आहे. पण तरीही आकडेवारी दोन हजार ते अडीज हजारांच्या आसपास स्थिरावत आहे. त्यातच आज दिवसभरात राज्यात २,३८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात ३५ रुग्णांचा मृत्यू झाला तर २,३४३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९७.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच राज्यात नवे रुग्ण २,३८४ आढळून आले आहेत. दरम्यान, राज्यात २९,५६० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात सध्या २,२६,२४९ रुग्ण होम क्वारंटाइन आहेत तर १,०७० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

loading image
go to top