Corona: दिवसभरात 5,508 नवे रुग्ण, टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्बंध होणार शिथिल

corona
coronae sakal

मुंबई : आज राज्यात 151 कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.नागपूर  मंडळात एक ही मृत्यूची नोंद झाली नाही.तर अकोला मंडळात केवळ एकच मृत्यू नोंदवला गेला. कोल्हापूर मंडळात आज सर्वाधिक मृत्यू झाले असून तेथे 55 मृत्यूची नोंद झाली. ठाणे 25,नाशिक 9,पुणे 50,औरंगाबाद 4,लातूर 7 मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्यूदर 2.1 % इतका आहे.तर मृतांचा एकूण आकडा 1,33,996 वर पोहोचला आहे.

corona
पुणे : निर्बंध शिथिल, सर्व दुकाने सर्व दिवशी सुरु

राज्यात आज दिवसभरात 5,508 नवीन रुग्णांची नोंद झाली.करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 63,53,328 झाली आहे.राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी वाढून 71,510 इतकी झाली.

corona
लोकल, मराठा आरक्षण, पूरपरिस्थिती; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

आज दिवसभरात 4,895 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 61,44,388 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.71 % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,95,68,519 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,53,328 (12.82 %) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,22,996 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,749 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

काय म्हणाले आज मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी रात्री आठ वाजता जनतेला संबोधित केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की, लोकल सेवा १५ ऑगस्टपासून सुरु होतील. मात्र, ही सुविधा फक्त दोन डोस घेऊन १४ दिवस झालेल्यांसाठीच उपलब्ध असेल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पासची सुविधा करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांनी कार्यालयीन कामाच्या वेळांची विभागणी करण्याचं आवाहन उद्योजकांना केलंय. उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की, सणासुदीचे दिवस पुढे आहेत, संकट संपलेलं नाहीये. उद्या टास्क फोर्सची बैठक झाल्यानंतर निर्बंधांबाबतचा विस्तारितपणे निर्णय कळवला जाईल. दोन डोस घेऊन १५ दिवस झालेल्यांना निर्बंधात शिथिलता देण्याचा विचार आहे. स्वातंत्र्यदिनाला शपथ घ्या की, आम्ही कोरोनामुक्त होऊ. त्यावेळी लोकमान्यांच्या 'स्वराज्य' घोषणेप्रमाणेच कोरोनापासून मुक्तीची प्रतिज्ञा करा, असंही त्यांनी म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com