Corona Update: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक

corona fight
corona fightcorona fight

मुंबई- Corona Update महाराष्ट्रातील (Maharashtra reports) कोरोना रुग्णांच्या संख्येत काही दिवसांपासून घट पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या 60 हजारांच्या पुढे आढळून येत होती. ती आता 50 हजारांच्या जवळपास येऊन ठेपली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 51 हजार 880 नव्या कोरोना (positive cases) रुग्णांची नोंद झाली आहे, तर 65 हजार 934 रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 891 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 6 लाख 41 हजार 910 कोरोनाचे सक्रिय रुग्ण (Active cases ) आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Corona Update Maharashtra reports COVID19 positive cases Active cases rajesh tope)

राज्यातील सुमारे 15 जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. आज दिवसभरात 51,880 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 48,22,902 झाली आहे. राज्यात मृतांचा आकडा वाढलेलाच असून आज 891 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबई मनपा 62 येथे सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून,नागपूर मनपा 84 , नाशिक 33 , जळगाव 32 , ठाणे 31, चंद्रपूर 30 , कोल्हापूर 29 , नांदेड 27 , मृत्यू नोंदवण्यात आले. मृत्यूचा दर 1.49 % इतका आहे. 

आज नोंद झालेल्या 891 मृत्यूंपैकी 397 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 258 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.तर 236 मृत्यू हे आठवड्यापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. राज्यात आज रोजी एकूण 6,41,910 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,81,05,382 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 48,22,902 (17.16 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 39,36,323 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 30,356 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

corona fight
कोरोना साहित्याच्या वाहतुकीबद्दल झाला महत्त्वाचा निर्णय

दिवसभरात 65,934  रुग्ण कोरोनामुक्त

आज 65,934 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 41,07,092 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.16 % एवढे झाले आहे.

राज्यात या जिल्ह्यांत रुग्णसंख्या नियंत्रणात

राज्यातील नांदेड, धुळे, मुंबई, भंडारा, ठाणे, नाशिक, लातूर, नंदूरबार, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, रायगड, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गोंदीया या जिल्ह्यांमधील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com