esakal | Corona Update: राज्यात दिवसभरात 62 हजार कोरोना रुग्णांची नोंद; 519 जणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

corona news

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 62 हजार 097 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 54,224 जणांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 519 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Corona Update: राज्यात दिवसभरात 62 हजार कोरोना रुग्ण; 519 जणांचा मृत्यू
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

मुंबई- महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 62 हजार 097 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 54,224 जणांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 519 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 39 लाख 60 हजार 359 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 61 हजार 343 कोरोना रुग्णांचा विषाणूने बळी घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे.

राज्यात कठोर निर्बंध लावून सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली नाही. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, काही तासांत लॉकडाऊनबाबतच्या गाईडलाईन्स जारी करण्यात येतील, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलीये. दुसरीकडे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काही तासांत राज्यात कडकडीत लॉकडाऊन लागू होण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

हेही वाचा: देशात कोरोना लसीचे 44 लाखांहून अधिक डोस वाया; 'या' राज्यांनी वापरले पूर्ण डोस

राज्यात सध्या ऑक्सिजन पुरवठयाची कमतरता आहे. त्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल संपूर्ण लॉकडाऊनकडे होत आहे. कडक लॉकडाऊनबाबतच्या गाईडलाईन्स लवकरच जारी करण्यात येतील, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली. संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची आज गरज आहे. निर्बंध लादूनही रुग्णसंख्या कमी होत नाही. त्यामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. लोकांचीही अशीच इच्छा आहे. कारण, सर्वांना माहिती आहे की आरोग्य सुविधा तोकड्या पडत आहेत, असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.