esakal | सहा जिल्ह्यांमध्ये स्थिती चिंताजनक
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

सहा जिल्ह्यांमध्ये स्थिती चिंताजनक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा दर देशाच्या तुलनेत कमी असला तरी नगर, सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमधील रुग्णवाढीचा दर अधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. शिवाय प्रशासकीय पातळीवरही सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, असा सल्ला कोरोना कृती दलाचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी दिलाय

राज्याच्या कोरोना रुग्णवाढीचा दर सध्या ०.०७ टक्के एवढा आहे; मात्र सहा जिल्ह्यांचा रुग्णवाढीचा दर हा सरासरीपेक्षा अधिक असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यात नगरमध्ये सर्वाधिक ०.२५ टक्के एवढा रुग्णवाढीचा दर आहे. त्याखालोखाल साताऱ्यात ०.१९ टक्के, सोलापूरमध्ये ०.१९ टक्के, सांगलीत ०.१५ टक्के, रत्नागिरीत ०.१३ टक्के आणि सिंधुदुर्गमध्ये ०.०९ टक्के एवढा रुग्णवाढीचा दर आहे. इतर जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर हा सरासरीपेक्षा कमी असून ०.०६ एवढा किंवा त्यापेक्षाही खाली आहे. नगर आणि सातारा जिल्ह्यांत अधिक खबरदारी बाळगण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: हरियाणामध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर पुन्हा पाण्याचे फवारे

मृत्युदर एक टक्क्यापेक्षा कमी

राज्यात फेब्रुवारीपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आणि त्यातून झालेल्या मृत्यूंचे प्रमाणही जास्त होते; मात्र गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबरच्या सुरुवातीला मृत्युदरामध्ये घट नोंदवण्यात आली. सध्या राज्याच्या मृत्यूदर एक टक्क्याच्या खाली असून, तो ०.६६ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.

फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर आधी दररोज चार हजार ६९० रुग्ण आढळत होते. तेव्हा एक हजार ४६४ मृत्यू नोंदवण्यात आले, तर मृत्युदर एक टक्क्यांवर १.११ टक्के होता. गेल्या आठ महिन्यांपैकी एप्रिल, मे आणि जून या महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. सध्या कोरोनाची लाट नियंत्रणात आली असली तरी एप्रिल, मे, जून या तिन्ही महिन्यांत मृत्युदर जास्त होता. आता त्यात घट झाली असून, रुग्णसंख्या कमी झाल्याने मृत्युदरातही कमी आल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत रुग्णवाढीचा दर ०.०५ टक्के

मुंबईत रुग्णवाढीचा दर राज्याच्या सरासरीपेक्षा कमी असून ही दिलासादायक बाब असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईखालोखाल पालघरचा रुग्णवाढीचा दर ०.०३ टक्के व नाशिक, औरंगाबाद, लातूर आणि बुलडाण्याचा रुग्णवाढीचा दर ०.०२ टक्के एवढा आहे.

रुग्णवाढीचा दर

(आकडेवारी टक्क्यांत)

०.२५

नगर

०.१९

सातारा

०.१९

सोलापूर

०.१५

सांगली

०.१३

रत्नागिरी

०.०९

सिंधुदुर्ग

loading image
go to top