esakal | कोरोनामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणाही दक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

Health-Checking

विठ्ठल भक्तांमध्ये कोरोनाची धास्ती 
पंढरपूर : कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीने प्रतिबंधात्मक उपायोजना आखायला सुरूवात केली आहे. भाविकांमध्येही सध्या भीतीचे वातावरण आहे. वास्तविक मंदिर समितीनेच दररोज स्वच्छता करणे अपेक्षित आहे. परंतु, अलीकडे स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब यानिमित्ताने समोर आली आहे. स्थानिक प्रशासनानेही शहरातील स्वच्छतेला गती देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

राज्यातील स्थिती

  • ६६९७७ जणांची मुंबई विमानतळावर तपासणी
  • १६७ जण विलगीकरण कक्षात
  • १६१ जणांना संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट

कोरोनामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणाही दक्ष

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना विषाणूंचा उद्रेक झालेल्या देशांतून मायदेशी येणाऱ्या नागरिकांची विमानतळांवरच तपासणी करणारी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागातर्फे ही माहिती देण्यात आली. मुंबईमध्ये १८ जानेवारीपासून आतापर्यंत ६७ हजार प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

राज्यात बाधित भागांतून ४५४ प्रवासी आले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनाची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसलेल्या प्रवाशांना राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. आतापर्यंत १६७ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी १६१ जणांना कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग झाला नसल्याचा निर्वाळा पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिला.

राज्यात २०१९ मध्ये कर्करोगाचे गेले इतके बळी

उर्वरित सहा जणांचे अहवाल येत्या गुरुवारपर्यंत (ता. ५) मिळतील. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या १६७ पैकी १५८ प्रवाशांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या सात जण मुंबईत, तर प्रत्येकी एक जण नाशिक व नांदेड येथील विलगीकरण कक्षात आहे, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

नाशिकमधील उद्योजक रुग्णालयात
नाशिक - व्यवसायाच्या निमित्ताने अमेरिकेमध्ये गेलेले उद्योजक नाशिकमध्ये परतले असून, त्यांना बुधवारी (ता. ४) सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना विशेष उपचार कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी पुण्याच्या शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल गुरुवारी (ता. ५) सायंकाळपर्यंत मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, परदेशातून परतलेल्या नाशिक शहरातील 18, तर जिल्ह्यात तीन जणांचे आरोग्य विभागाच्या विशेष पथकाकडून नियमित निरीक्षण केले जात आहे. तर तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कोरोनाग्रस्त देशातून नाशिकमध्ये आलेल्या 18 जणांवर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून लक्ष ठेवले जात आहे.

एकाच कंपनीचे आठ कर्मचारी
सातपूर औद्योगिक वसाहतीतील आठ कर्मचारी हे इटली येथे कंपनीच्याच कामकाजानिमित्ताने गेले होते. हे आठही कर्मचारी गेल्या 29 फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये परतले आहेत. इटलीचा समावेश कोरोनाग्रस्त देशात असल्याने या आठही जणांची आरोग्य चाचणी जिल्हा रुग्णालयात घेण्यात आली असून त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. तरीही त्यांची आरोग्य यंत्रणेकडून नियमित तपासणी केली जात आहे.

loading image