Corona Update : राज्यात बारा हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण; नव्या रुग्णांची पडतेय भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus test

राज्यात बारा हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण; नव्या रुग्णांची पडतेय भर

मुंबई : राज्यात दिवसभरात कोरोना संसर्गबाधित रुग्णांची आणखी भर पडली. यामुळं राज्यात सुमारे बारा हजार अॅक्टिव्ह रुग्ण झाले आहेत. तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णवाढीनंतर राज्यात BA.5 व्हेरियंटचे १४ रुग्ण तर BA.2.75 व्हेरियंटचे ३५ रुग्णांची नोंद झाली आहे. (Coronavirus Maharashtra corona update 12 thousand active cases in maharashtra)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज दिवसभरात १,९३१ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले, तर ९ रुग्णांचा मृ्त्यू झाला. त्याचबरोबर १,९५३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ११,८७५ वर पोहोचला.

हेही वाचा: पुणे : MPSC परीक्षेदरम्यान गैरप्रकार; फोन, ब्लूट्युथचा वापर केल्यानं खळबळ!

बीजे मेडिकल कॉलेजच्या माहितीनुसार, राज्यातील BA कॅटेगिरीतील व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी BA.2.75 चा एक रुग्ण सोलापूरमध्ये तर दोन रुग्ण अकोल्यात आणि दोन्ही व्हेरियंटचे मिळून उर्वरित ४६ रुग्ण हे पुण्यामध्ये आहेत. या सर्व पॉझिटिव्ह केसेस या २० ते २८ जुलै दरम्यानच्या आहेत.

BA व्हेरियंटच्या रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी

दरम्यान, राज्यात BA.4, BA.5 व्हेरियंटची लागण झालेले एकूण २७२ रुग्ण आहेत. तर BA.2.75 व्हेरियंटचे २३४ रुग्ण आहेत. BA.4, BA.5 चे जिल्हानिहाय रुग्ण असे पुणे - १७७, मुंबई -५१, ठाणे -१६, रायगड - ७, सांगली - ५, नागपूर - ८, पालघर - ४, कोल्हापूर - २. तर BA.2.75 चे जिल्हानिहाय रुग्ण असे पुणे - १५९, नागपूर - ३३, यवतमाळ - १२, सोलापूर - ९, मुंबई - ५, अकोला - ६, ठाणे - ३, वाशिम -२, अमरावती-बुलडाणा-जालना-लातूर-सांगली प्रत्येकी १.

Web Title: Coronavirus Maharashtra Corona Update 12 Thousand Active Cases In Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..