esakal | Coronavirus : राज्यात कोरोनाग्रस्त हजार प्लस; दिवसात वाढले 150 जण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-in-Maharashtra
  • २०,८७७ - नमुन्यांची तपासणी 
  • १,०१८ - पॉझिटिव्ह
  • ४,००८ - संस्थात्मक विलगीकरण
  • १९,२९० - निगेटिव्ह
  • ३४,६९५ - घरगुती विलगीकरण
  • ७९ - बरे झालेले रुग्ण 

निजामुद्दीन येथून परतलेल्यांचा शोध
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत या व्यक्तींपैकी २३ जण कोरोना बाधित आढळले. लातूरमध्ये ८, बुलडाणा जिल्ह्यात ६ आणि  प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि नगर भागातील आहेत.

Coronavirus : राज्यात कोरोनाग्रस्त हजार प्लस; दिवसात वाढले 150 जण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्येने एका महिन्याच्या आतच हजाराचा टप्पा ओलांडला. त्यात आज १५० नवीन रुग्णांची भर पडली. यात १०० रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. तर, १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात ९ मार्चला पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर प्रत्येक दिवशी कोरोनच्या संसर्गाचे निदान होऊ लागले. एक महिन्याच्या आतच राज्यात कोरोनाबाधित एक हजार १८ रुग्णांची नोंद सार्वजनिक आरोग्य विभागात झाली. राज्यात १२ कोरोना बाधित रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाला.  मृत्यू झालेल्या कोविड बाधित रुग्णांमध्ये इतरही आजार आढळले आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी ६ मुंबईत, ३ पुण्यात तर प्रत्येकी एक मृत्यू नागपूर, सातारा आणि मीरा भाईंदर येथे झाला आहे.

कोरोनाचा फटका मुकेश अंबानी यांना; संपत्ती होतेय मोठी घसरण

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता वेगाने वाढू लागली आहे. मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे १०० नवे रुग्ण सापडले. त्यामुळे बाधितांचा आकडा ५९० वर पोहोचला. त्यापैकी बहुतेक रुग्ण वरळी, प्रभादेवी, दादर, धारावी, गोवंडी, अंधेरी या भागांतील असल्याचे समजते. नव्या १०० रुग्णांपैकी ५५ जण प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांच्या संपर्कात होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने घरोघरी घेतलेली शोधमोहीम, दवाखाने आणि संशयित रुग्णांच्या चाचणीतून ही माहिती समोर आली.

तीन हजारांवर सर्वेक्षण पथके
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. सध्या साताऱ्यात २१४ सर्वेक्षण पथके काम करत आहेत तर हिंगोलीत ३४, सांगलीत ३१, रत्नागिरीमध्ये ३९ आणि जळगावमध्ये ४८ सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. राज्यात या प्रकारे तीन हजार ४९२ सर्वेक्षण पथके  काम करत असून त्यांनी १२ लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

loading image
go to top