Corona-in-Maharashtra
Corona-in-Maharashtra

Coronavirus : महाराष्ट्र राज्यातील रुग्णसंख्या ३३७ वर, दिवसभरात सहा जणांचा मृत्यू

Published on

पुणे - कोरोनाने बाधित झालेल्या सहा जणांचा आज मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृतांची एकूण संख्या १६वर पोहोचली.

दरम्यान, कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या ३५ नवीन रुग्णांची नोंद आज झाली. यापैकी ३० रुग्ण मुंबईचे, पुण्यातील ४ तर बुलडाण्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३३७ झाली आहे. 

मृत्युमुखी पडलेल्यांत तीन पुरुष व तीन महिलांता समावेश आहे. या सहा पैकी पाच जण मुंबईतील, तर एक पालघरचा आहे. मृत्युमुखी पडलेल्या महिलांची वये अनुक्रमे ८४, ७३ आणि ६३ अशी आहेत. यातील एका महिलेचा नायर रुग्णालयात, इतर दोघींचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पुरुषांपैकी एक  ७५ वर्षीय आहे, तर दुसरा ५१ वर्षीय आहे. याशिवाय ५० वर्षीय एका पुरुषाचा पालघर येथे मृत्यू  झाला आहे. हे तिन्ही रुग्ण परदेशातून प्रवास करून आले नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com