राज्यात दिवसभरात एवढे नवीन रुग्ण, तर एवढे मृत्यू; वाचा सविस्तर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 मे 2020

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ६४२ झाली आहे. आज २३४५ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १४०८ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. राज्यात आज ६४ जणांचा मृत्यू झाला.

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ६४२ झाली आहे. आज २३४५ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १४०८ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. राज्यात आज ६४ जणांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख १९ हजार ७१० नमुन्यांपैकी २ लाख ७८ हजार ६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर, ४१ हजार ६४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ३७ हजार ३०४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६ हजार ८६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्यात ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १४५४ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४१, मालेगाव ९, पुण्यात ७, औरंगाबाद  शहरात ३, नवी मुंबईमध्ये २, पिंपरी- चिंचवड -१ तर सोलापूरात एकाचा मृत्यू झाला आहे. 

'आत्मनिर्भर भारत घडवायचा असेल तर...'; काय म्हणाले नितीन गडकरी पाहा!

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३६  पुरुष तर २८ महिला आहेत. आज झालेल्या ६४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३१  रुग्ण आहेत तर २९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६४ रुग्णांपैकी ३८ जणांमध्ये ( ५९ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४५४ झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus patient increase in maharashtra state