'आत्मनिर्भर भारत घडवायचा असेल तर...'; काय म्हणाले नितीन गडकरी पाहा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

देशात मुक्त अर्थव्यवस्थेचे प्रारूप तयार करून अर्थव्यवस्थेचे चक्र सुरू करावे लागणार आहे.

पुणे : "कोरोनामुळे जगभरातील अनेक देशांची अर्थव्यवस्था अडचणीत आली असून भारत ही याला अपवाद राहिला नाही. अर्थव्यवस्था अडचणीत असताना या महामारीने जगाला आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भारत या संकटाकडे एक संधी म्हणून पाहत आहे. भविष्यात सुनियोजन करून स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. स्वदेशीचा पुरस्कार हाच विकासाचा मूलमंत्र ठरवून आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल," असे मत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

- Big Breaking : पुण्यात कोरोनाचा हाहाकार; रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक!

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॅालॅाजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोरद्वारा आयाोजित वेबिनारमध्ये गडकरी बोलत होते. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी एसओएचडीच्या डॉ. जयश्री फडणवीस आदी सहभागी झाले होते." एमआयटी एडीटी विद्यापीठात गेल्या तीन वर्षापासून सर्वंकष विकास करणारे शिक्षण दिले जात आहे. देशातील आणि राज्यातील सरकारी आणि खासगी विद्यापीठाने या शिक्षण पद्धतीचा आत्मसात करून विद्यार्थी घडवावे," असे आवाहन डॉ. कराड यांनी केले.

- पुण्यातील गणेश मंडळांचा 'तो' निर्णय स्वागतार्ह; राज्यातील सर्व गणेश मंडळांना उपमुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले :
- यातून सावरण्यासाठी प्रत्येकांने सकारात्मक विचार आणि त्यासाठी मानसिकता बदलावी
- हताश झालेल्या मजूरांमध्ये आत्मविश्वास जगविण्याची आवश्यकता
- सध्याचे युवक आत्मविश्वासू आणि आत्मनिर्भर
- देशाचे भविष्य सध्याच्या शिक्षण पद्धतीवर अवलंबून

मुल्यात्मक शिक्षणाच्या साथीने सर्वंकष विकास शक्य
"मुल्यात्मक शिक्षणाची प्राचीन परंपरा देशात आहे. धर्म, संस्कृती आणि भारतीय तत्वज्ञान मुल्यात्मक शिक्षणाचे उगमस्थान आहेत. आता विद्यापीठीय शिक्षण पद्धतीत बदल करून मुल्यात्मक शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास करणाऱ्या शिक्षण पद्धतीचा गरज आहे," असे गडकरी यांनी नमूद केले.

- आता घरबसल्या मिळणार पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तके; 'बालभारती'कडे करा 'ऑनलाईन ऑर्डर'!

मुक्त अर्थव्यवस्थेची गरज
"कोरोनाच्या महामारीमुळे अर्थव्यवस्थेपुढे आव्हान तयार केले आहे. देशाने आपली ताकद आणि आपल्यातील कमतरता ओळखून नियोजन करावे. देशात मुक्त अर्थव्यवस्थेचे प्रारूप तयार करून अर्थव्यवस्थेचे चक्र सुरू करावे लागणार आहे. समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण यासह मजबूत सत्ताकारण निर्माण करून देशाला प्रगतीपथावर नेण्याची गरज आहे," असेही मत त्यांनी मांडले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Initiative to use of indigenous goods to build self reliant India said Union Minister Nitin Gadkari