esakal | Cororna Update : राज्यात दिवसभरात 6,017 नवीन रुग्णांची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

maha_covid

Cororna Update : राज्यात दिवसभरात 6,017 नवीन रुग्णांची नोंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात आज दिवसभरात 6,017 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 62,20,207 झाली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,03,486 वरून 96,375 पर्यंत खाली ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (Cororna Update 6017 new patients registered in maharashtra aau85)

हेही वाचा: पेट्रोल-डिझेलबाबत GST परिषदेत चर्चा नाही; केंद्राची लोकसभेत माहिती

राज्यात आज 66 रुग्ण दगावले. मृतांचा एकूण आकडा 1,27,097 वर पोहोचला आहे. आज सर्वाधिक 24 मृत्यू ठाणे मंडळात नोंदवण्यात आले. तर पुणे 1, कोल्हापूर 16, औरंगाबाद 1, नाशिक 17, अकोला 1, नागपूर 3 व लातूर मंडळ 3 मृत्यू नोंदवले गेले. मृत्यूचा दर 2.04 टक्के इतका झाला आहे.

हेही वाचा: रिलायन्स, इंडियन ऑइलची नाशिकमध्ये दीड हजार कोटींची गुंतवणूक

आज दिवसभरात 13,051 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 59,93,401 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  96.35 टक्के एवढे झाले आहे.

हेही वाचा: कांदिवलीत पावसाचा धुमाकूळ, एकाच चाळीत 9 झोपड्या जमीनदोस्त

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,56,48,898 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,20,207 (13.63 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,61,796 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,052 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image