शिवस्मारक उभारणीत भ्रष्टाचार..! 

शिवस्मारक उभारणीत भ्रष्टाचार..! 

मुंबई - राज्यातील 11 कोटी शिवप्रेमी जनतेची आस्था असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारक उभारणीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, या स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहल्याने खळबळ उडाली. मेटे यांनी पाच पानांचे पत्र पाठवून स्मारकाच्या निविदा प्रक्रियेत सरकारी अधिकारी व कंपनीच्या संगनमताने निधीची लूट सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. या सर्व प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी; अन्यथा या अधिकाऱ्यांवर विधिमंडळात हक्‍कभंग प्रस्ताव आणण्याचा इशाराही मेटे यांनी पत्रात दिला आहे. 

मेटे यांना या पत्रात अतिशय गंभीर बाबी मांडल्या आहेत. यामध्ये शिवस्मारकाची निविदा प्रक्रिया बेकायदा आणि त्यात आर्थिक देवाणघेवाणीचा उल्लेख केला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कृती व समन्वय समितीचे विनायक मेटे हे अध्यक्ष आहेत व ही शासकीय समिती आहे. त्यामुळे मेटे यांच्या या पत्राचे गांभीर्य अधिक आहे. 

मेटेंचे आरोप 
शिवस्मारक प्रकल्पाच्या 3826 कोटी रुपये किमतीच्या पहिल्या टप्प्याच्या कामासंदर्भातील हे आरोप आहेत. ही सर्व प्रक्रिया अनैतिकतेच्या पद्धतीने पुढे नेण्याचा घाट घालण्यात आला. प्रकल्पाला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता नसताना वर्क ऑर्डर देण्यात आली. वाटाघाटी करीत असताना कॉस्ट ऑप्टीमायझेशन व मूळ निविदेत नमूद कामात अनेक बदल करण्यात आले, वाटाघाटीतून किंमत कमी झालेली दिसत असली तरी कामे कमी झाल्यामुळे किंमत कमी झालेली आहे, अर्थपूर्ण बाबी डोळ्यासमोर ठेवून वर्कऑर्डर देण्याची घाई करण्यात आली, लेखापालांची शिफारस दुर्लक्षिण्यात आली, वर्क ऑर्डर देण्यापूर्वी लेखापालांची मान्यता घेण्यात आली नाही, बोगस हमीपत्र तयार करण्यात आले; करारनामा, वर्क ऑर्डर देण्याकरिता मंत्रालयीन पातळीवरून संबंधित अधिकाऱ्यांना दबाव टाकून दहशतीखाली घेऊन, तुमचे निलंबन करू, तुमची चौकशी करू, अशाप्रकारची भीती दाखवून करारनामा व कार्यारंभ आदेशावर सही घेण्याचे काम केले गेले, मोबीलायझेशन ऍडव्हान्स देण्याची पद्धत महाराष्ट्रात कुठेही नसताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकल्पात ही पद्धत जाणीवपूर्वक कंपनीच्या फायद्यासाठी वापरली. त्रुटी, संहेतूक कृती, बेजबाबदारपणे वागणे, बोगस कागदपत्रे बनविणे, उच्चाधिकार समिती व देखरेख समितीस अंधारात ठेवणे, कंपनीस फायदा पोचविणे, पीएमसीने योग्य काम न करणे, अशाप्रकारचे गंभीर आरोप स्वत: समितीच्या अध्यक्षांनी केले आहेत. एवढेच नाही तर त्यांनी स्वत: या सर्व घोटाळ्यांची चौकशी करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

दरम्यान, विनायक मेटे यांचे आरोप गंभीर असून, या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा. 
- धनंजय मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com