

मतमोजणी
तात्या लांडगे
सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या (सोमवार, ता. ९) सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. या निवडणुकीचे चित्र दुपारी ३ पर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या सर्वाधिक २४ फेऱ्या अक्कलकोट आणि पंढरपुरात होणार आहेत. सर्वात कमी ९ फेऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यात होणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत २४ लाख ५९ हजार २२७ मतदारांपैकी १६ लाख २० हजार ५७७ एवढ्या मतदारांनी (६५.९० टक्के) मतदानाचा हक्क बजाविला आहे. या मतांची मोजणी करण्यासाठी जिल्ह्यात ११ ठिकाणी एकूण २०४ टेबल असणार आहेत. पोस्टल मतांची मोजणी करण्यासाठी २७ टेबल असणार आहेत.
करमाळा तालुक्याची मतमोजणी शासकीय धान्य गोदामात होणार आहे. करमाळ्यासाठी १६ टेबल असणार आहेत. माढा तालुक्याची मतमोजणी कुर्डूवाडीतील आकुलगाव रोडवरील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. माढ्यासाठी २० टेबल असणार आहेत. बाशी तालुक्याची मतमोजणी बार्शीतील उपळाई रोडीवरील शासकीय धान्य गोदामात होणार असून या तालुक्यासाठी २४ टेबल असणार आहेत. उत्तर सोलापू्र तालुक्याची मतमोजणी सोलापुरातील नुतन मराठी विद्यालयात होणार असून या तालुक्यासाठी ९ टेबल असणार आहेत. मोहोळ तालुक्याची मतमोजणी शासकीय धान्य गोदामात होणार असून या तालुक्यासाठी २० टेबल असणार आहेत. पंढरपूर तालुक्याची मतमोजणी कराड रोडवरील शासकीय धान्य गोदामात होणार असून या तालुक्यासाठी १६ टेबल असणार आहेत. माळशिरस तालुक्याची मतमोजणी माळशिरसमधील म्हसवड रोडवरील शासकीय धान्य गोदामात होणार असून या तालुक्यासाठी २४ टेबल असणार आहेत.
सांगोला तालुक्याची मतमोजणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन येथे होणार असून या तालुक्यासाठी २० टेबल असणार आहेत. मंगळवेढा तालुक्याची मतमोजणी पंढरपूर रोडवरील शासकीय धान्य गोदामाच्या हॉल क्र.०१ मध्ये होणार असून या तालुक्यासाठी २० टेबल असणार आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्याची मतमोजणी सोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १० च्या शहीद राहूल शिंदे बहुउद्देशिय सभागृहात होणार असून या तालुक्यासाठी १६ टेबल असणार आहेत. अक्कलकोट तालुक्याची मतमोजणी तहसील कार्यालयात होणार असून या तालुक्यासाठी १४ टेबल असणार आहेत.
कोणत्या तालुक्याच्या किती फेऱ्या
अक्कलकोट व पंढरपूर : प्रत्येकी २४
दक्षिण सोलापूर : १९
करमाळा, माळशिरस, सांगोला : प्रत्येकी १८
माढा : १६
मोहोळ : १३
बार्शी : १२
मंगळवेढा : ११
उत्तर सोलापूर : ९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.