अमित देशमुखांना न्यायालयाचा दिलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

मुंबई - कॉंग्रेसचे लातूर मतदारसंघातील आमदार अमित देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत केलेल्या अवाजवी खर्चासंदर्भात दाखल करण्यात आलेली "विशेष परवानगी याचिका' फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयाचा निर्णय गुरुवारी कायम ठेवला आहे.

मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत, निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला असल्याचा आरोप करीत अण्णा पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पुरेसे पुरावे नसल्याचे कारण देत उच्च न्यायालयाने 18 जुलै 2016 रोजी ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर अण्णा पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात "विशेष परवानगी याचिका' दाखल केली होती. आज या याचिकेच्या अंतिम सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका पेटाळून लावली आहे. अण्णा पाटील हे अमित देशमुख यांच्या विरोधात 2014 ची विधानसभा निवडणूक लढले होते. त्यांना या निवडणुकीत केवळ 400 मते मिळाली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. तक्रारदार अण्णा पाटील यांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीनंतरही अशाच आशयाची याचिका न्यायालयात केली होती. तेव्हाही ती फेटाळण्यात आली होती. अशा प्रकारे खोटी तक्रार करण्यामागे वैयक्तिक स्वार्थ दिसून येत आहे. आता तक्रारदाराच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे.
- अमित देशमुख, कॉंग्रेस आमदार

Web Title: Court comfort Amit Deshmukh