नीलेश लंकेंनी न्यायालयीन लढाईसुद्धा जिंकली, सुजय विखे पाटलांना दणका

MP Neelesh Lanke खासदार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी सुजय विखे पाटील यांची याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावलीय. नीलेश लंके यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला आहे.
Sujay Vikhe Patil plea rejected Neelesh Lanke secures court victory

Sujay Vikhe Patil plea rejected Neelesh Lanke secures court victory

Esakal

Updated on

अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी निवडणूक याचिका कोर्टाने फेटाळून लावलीय. लोकसभा निवडणुकीत पराभावाची धूळ चारणाऱ्या लंकेंनी विखे-पाटलांविरोधात न्यायालयीन लढाईसुद्धा जिंकलीय. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. किशोर सी. संत यांनी निलेश लंकेंनी सादर केलेला अर्ज ग्राह्य धरलाय. तर माजी खासदार सुजय विखे पाटलांची याचिका निकालात काढली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com