महाराष्ट्रात कोरोनाचा कहर; मुंबईपेक्षा पुण्यात दुप्पट सक्रीय रुग्ण

maharashtra corona update
maharashtra corona update

मुंबई - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून देशात सर्वाधिक रुग्ण राज्यात आढळत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, जर लोकांना कोरोनाच्या नियमावलीचं पालन केलं नाही तर कठोर निर्बंध आणि लॉकडाऊन हा एक पर्याय असू शकतो. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जितके रुग्ण आढळत होते तितके रुग्ण आता सापडत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारनेसुद्धा महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबाबत चिंता व्यक्त करताना राज्याला इशारा दिला आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 25 हजार 681 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 14 हजार 400 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत 21 लाख 89 हजार 965 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा 90.42 टक्के इतका आहे. गेल्या दिवसभरात 70 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत. राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे 2.20 टक्के इतकं आहे. 

आतापर्यंत 1 कोटी 80 लाख 83 हजार 977 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 24 लाख 22 हजार 21 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पॉझिटिव्हीटी रेट हा 13.39 टक्के इतका आहे. सध्या राज्यात सक्रीय रुग्णांपैकी 8 लाख 67 हजार 333 जण होम क्वारंटाइन आहेत तर 7 हजार 848 रुग्ण हे संस्थांत्मक क्वारंटाइन आहेत. 

राज्यात पुणे, मुंबई, नागपूर, नाशिकमध्ये सर्वाधिक सक्रीय रुग्ण आहेत. यामध्ये मुंबईच्या तुलनेत पुण्यातील रुग्णांची संख्या ही जवळपास दुप्पट आहे. पुण्यात सध्या 37 हजार 384 रुग्ण उपचार घेत असून मुंबईत 18 हजार 850 सक्रीय रुग्ण आहेत. पुण्यानंतर नागपूरमध्ये जास्त सक्रीय रुग्ण आहेत. नागपुरात सध्या 25 हजार 861 जण उपचार घेत आहेत. याशिवाय ठाण्यात 16 हजार 735 तर नाशिकमध्ये 11 हजार 867 सक्रीय रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात गुरुवारी सापडेलल्या रुग्णांपेक्षा शुक्रवारी जवळपास 200 रुग्ण कमी आढळले आहेत. गुरुवारी राज्यात 25 हजार 833 नवीन कोरोना रुग्ण सापडले होते. तर 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. गुरुवारी दिवसभरात 12 हजार 764 रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com