राज्यात लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न राबवणार ? Covid -19 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid-19-vaccine

दरम्यान आता संपूर्ण राज्यात लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न राबवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.

राज्यात लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न राबवणार ?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद - राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटत आहे. काल दिवसभरात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आता संपूर्ण राज्यात लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न राबवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला असल्याचे खात्रीशीर वृत्त समोर येत आहे. लसीचा एकही डोस न घेतलेल्या लोकांना पेट्रोल, डिझेल, राशन आणि गॅस मिळणार नसल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा: एसटीला आर्थिक गर्तेत लोटू नका, महामंडळाचे कर्मचाऱ्यांना आवाहन

दरम्यान, राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकार औरंगाबाद पॅटर्न राबवणार आहे का ? हा सवाल उपस्थित झाला आहे. सर्व मंत्र्यांनीही राज्यभर औरंगाबाद पॅटर्न राबवण्यात यावा असे या बैठकीत म्हटले आहे. देशात आणि राज्यात जरी कोरोनाचे रुग्ण कमी असेल तरी, जगभरातील काही देशात ही संख्या काही प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संरक्षणासाठी पुर्वतयारी म्हणून हा पॅटर्न राबवण्यात यावा असेही या बैठकीत सांगण्यात आले आहे.

काय आहे नेमका औरंगाबाद पॅटर्न ?

औरंगाबादमध्ये लसीरकणाबाबत अल्प प्रतिसाद असल्याने कोरोना तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा पॅटर्न राबवला जाणार आहे. ज्या नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतलेला नाही त्यांना पेट्रोल, डिझेल आणि गॅस मिळणार अशा जीवनावश्यक वस्तू मिळणार नसल्याचा हा निर्णय आहे. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाही लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सुविधा उपलब्ध करुन द्याव्या, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता हा औरंगाबाद पॅटर्न राज्यभर राबवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा: अनिल देशमुखांची ED कोठडी आज संपणार; CBI कारवाईची टांगती तलवार?

loading image
go to top