
या व्हेरियंटबाबत कोणतीही खात्रीलायत माहिती मिळालेली नाही - राजेश टोपे
XE व्हेरियंट संदर्भात आरोग्य मंत्र्यांचं दिलासादायक वक्तव्य, म्हणाले...
राज्यात कोरोनाचा धोका कमी झाला आहे. राज्य सरकारने राज्यातीस सर्व कोरोना निर्बंधही हटवले आहेत. परंतु आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. कोरोनाच नवा व्हेरियंट एक्स ईचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. असे असले तरी चिंता करण्याचे कारण नसून काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. एक्सई व्हेरियंटबाबत कोणतेही अधिकृत माहिती मिळालेली नाही, त्यामुळे चिंता करायची गरज नाही असा दिलासा त्यांनी दिला आहे.
यांसदर्भात मंत्री टोपे म्हणाले, या व्हेरियंटबाबत कोणतीही खात्रीलायत माहिती मिळालेली नाही. याशिवाय कुठल्याही प्रकारची दाहकताही नाही. याचा 10 ते 15 टक्के पेक्षाही अधिकचा संसर्ग नाही. मात्र अद्याप याबाबत कुठलेही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे चिंता करायची गरज नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीकडून यासंदर्भात कोणत्याही प्रकारची खात्रीलायक माहिती मिळालेला नाही. काही माहिती उपलब्ध झाल्यास संदर्भातील सूचना देऊ, असेही ते म्हणाले आहेत.
मुंबईत कोरोनाचा XE व्हेरियंट आढळला आहे. बुधवारी मुंबई कोरोनाचा XE व्हेरियंट आढळल्याचं बीएमसीकडून (Mumbai Municipal Corporation) सांगण्यात आले होते. नव्या व्हेरियंटची चर्चा सुरु असताना WHOच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन (WHO Chief Scientist Soumya Swaminathan) यांनी मात्र दिलासा देणारी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, XE व्हेरियंट डेल्टा इतका प्रभावी नाही.
Web Title: Covid 19 Xe New Variant Health Minister Rajesh Tope Says No Fear Take Care
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..