पुणे - सध्याच्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सौम्य वाढ होत असली तरी सध्याचा विषाणू हा घातक नसून सौम्य स्वरूपाचा आहे. हा ओमायक्रॉन नंतरच्या ‘जेएन.१’ चा उपप्रकार असून त्याने रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही. आताचा कोरोना हा सर्दी – खोकल्यासारखा सामान्य आहे, अशी माहिती साथरोगतज्ज्ञ डॉ. अमिताभ बॅनर्जी यांनी दिली.