esakal | शिवसेनेत बाळासाहेबांचा एकच गट, पक्षात गटबाजी नाही- संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

शिवसेनेत बाळासाहेबांचा एकच गट, पक्षात गटबाजी नाही- संजय राऊत

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

मुंबई: सध्या राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मागील काही दिवसांपासून वेगळी भूमिका मांडत आहे. याची सुरवात नाना पटोलेंनी (nana patole) केली होती. पटोली यांनी काँग्रेस आगामी निवडणूक स्वःबळावर लढेल असं सांगितले आहे. त्यास काँग्रेसच्या इतर प्रमुख नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. यास प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी राज्यातील सरकार पाच वर्ष चालणार. तसेच विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी हे सरकार पडणार नाही.

राऊत बोलताना पुढे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगला समन्वय आहे. तीन पक्षांचे सरकार चांगले काम करत आहे. देशात आघाडीचे सरकार कसे चालवलं जाऊ शकतं याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रातील सरकार आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्यां पाठीशी आहेत.

हेही वाचा: Unlock: आजपासून आणखी १३ बस रस्त्यावर; 12 मार्गावर होणार ४४४ फेऱ्या

'शिवसेना पोखरली गेली नाही'-

प्रताप सरनाईक यांच्या प्रकरणावर प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, सध्या शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंचा एकच गट आहे. शिवसेनेला अजूनतरी गटबाजीने पोखरलेले नाही. आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उत्तम काम करत आहोत. उद्धव ठाकरेंसह सर्व शिवसेना परिवार सरनाईक यांच्या पाठीशी आहोत असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा: पर्यटनस्थळे हाऊसफुल! मकबरा, वेरूळ- अजिंठ्याला पर्यटकांची गर्दी

विरोधकांनी शवासन करावे-

पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी भाजपालाही टोला लगावला. सत्ता मिळत नसल्यानं विनाकारण त्रास देणं हा भारतीय लोकशाहीला वाईट आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा उपयोग करून त्रास दिला जातोय हा सरनाईक यांच्या पत्राचा सार होता. महाभारतातील योद्धे आम्ही आहोत आणि मी संजय आहे असंही राऊत म्हणाले. तसेच विरोधकांनी शवासन करावे असाही टोलाही राऊत यांनी विरोधकांना लगावला

loading image
go to top