Covid19: राज्यात 39 मृत्यू, तर 1573 नव्या रुग्णांची भर 

राज्यात सध्या सक्रीय रुग्णांची संख्या 24,292 आहे.
Covid Test
Covid Testsakal

मुंबई: राज्यात आज 1573 बाधित रुग्णांची नोंद झाली.तर 39 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा 1,39,925 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 24,292 इतकी आहे.

करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,98,218 झाली आहे.कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण वाढले आहेत. तर 2968 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,30,394 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.46 % एवढे झाले आहे.

औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 8,नाशिक 5,पुणे 18,कोल्हापूर 3,लातूर 3,अकोला 1,नागपूर 1 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,01,162 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1007 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com